esakal | Maharashtra Bandh : दुर्देव आहे माणुसकी राहिलेली नाही - सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule

Maharashtra Bandh : दुर्देव आहे माणुसकी राहिलेली नाही - सुप्रिया सुळे

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "लखीमपूरमध्ये (Lakhimpur) जी घटना झाली. देशातल्या अन्य राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होताना दिसतोय. त्याच्या विरोधात महाराष्ट्रात बंद होतोय. त्याच्या समर्थनार्थ आम्ही इथे जमलेलो आहोत" असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) म्हणाल्या. भाजपा-मनसेने (mns) बंदला विरोध केला आहे, त्या प्रश्नावर सुप्रिया सळे म्हणाल्या की, "दुर्देव आहे माणुसकी राहिलेली नाही. आधी राजकारणात माणुसकी जिवंत होती. केंद्रात असलेल्या सरकारने तिच माणुसकी संपवली आहे"

"ज्या लोकांचा खून मंत्र्याच्या मुलाने केला, त्या विरोधात आम्ही उभे राहिलो आहोत. आजही तो व्हिडीओ बघितला की, अंगावर शहारे येतात. हा क्रूरपणा आहे. याचा जाहीर निषेध करुन चालणार नाही, त्याला अटक होण्यासाठी इतका वेळ लागला. केंद्रातील मंत्र्याने नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे" असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा: EPFO | पीएफ खातेधारकांना 'दिवाळी गिफ्ट'?

सीबीआयने अनिल देशमुख यांचा मुलगा आणि सुनेविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. त्या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाल्या की, "केंद्र सरकार मोगलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात कधीच महिलांवर हात उचलला नाही. महिलांचा कायम मानसन्मान ठेवला. मोगलांच्या राज्यात अत्याचाराचा इतिहास देशाने पाहिला आहे. आता मोगलांच्या राज्यात महिलांचा मानसन्मान संस्कृतीत दिसत नाही. या देशातील महिला त्यांना अबला वाटतात" अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

loading image
go to top