शिवस्मारक तर होणारच, पण भ्रष्टाचारही समोर आणणार : नवाब मलिक

NCP Leader Nawab Malik speaks on corruption related to Shivsmarak
NCP Leader Nawab Malik speaks on corruption related to Shivsmarak

मुंबई : शिवस्मारक कामात भ्रष्टाचार झाला याचा पर्दाफाश आम्ही केला आहे त्यामुळे हा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडून भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी शिवस्मारकाबाबत बोलताना नवाब मलिक यांनी विरोधी पक्षाचे चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे. 

याप्रकरणी सरकारने चौकशी समिती स्थापन करावी आणि चौकशीत चंद्रकात पाटील यांनी भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध करुन दाखवणारच असे आमदार नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी आघाडी सरकारने जागा निश्चित केली होती.मात्र भाजपाचे सरकार आल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. परंतु अजूनही तिथे काम सुरु झालेले नाही. निविदा काढण्यात आली. फेरनिविदा काढून पुन्हा ठेका देण्यात आला. त्याप्रक्रियेत फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे सार्वजनिक खात्यातील अधिकारी यांनी कॅगला कळवले होते. वरिष्ठ इंजिनिअर ऑर्डर द्यायला तयार नव्हते. शेवटी कनिष्ठ अधिकार्‍यांनी ती वर्कऑर्डर दिली होती. ही कागदपत्रे आहेत. मी आणि कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी दोनवेळा प्रेस घेवून जनतेसमोर आणले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

कॅगने अहवाल दिल्यानंतर शिवस्मारकात भ्रष्टाचार होत असल्याचे सिद्ध होत आहे. चंद्रकात पाटील त्याकाळात मंत्री होते. त्यांनीच यात हात धुतला होता. ज्यावेळी आम्ही प्रेस घेवून ट्वीट केले. त्यांनी याप्रकरणी खुलासा करावा अशी मागणी केली होती. भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना खुलासा नीटपणे करता आला नाही. आज सांगत आहेत की स्मारकाचे काम थांबवण्यासाठी केलं जात आहे परंतु स्मारकाची कामेच सुरु झालेली नाही. स्मारक हे होणारच परंतु यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न सभागृहात मांडणार आहे.असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com