कुटुंबातील संभाषण शरद पवारांना सांगितले : पार्थ पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्याविषयी माहिती दिली. अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी मला कोणतीही माहिती दिली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी यावेळी अजित पवार यांनी आपल्या मुलांना राजकारण सोडण्याचा सल्ला देत कुटुंबीयांशी राजीनाम्याबाबत चर्चा केल्याचेही सांगितले होते.

मुंबई : अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा मुलगा पार्थ पवार याने ट्विट करत आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आणि अत्यंत अवघड होता. वडिलांबरोबर झालेले संभाषण आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून शरद पवार यांना सांगितले आहे, असे म्हटले आहे.

शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्याविषयी माहिती दिली. अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी मला कोणतीही माहिती दिली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी यावेळी अजित पवार यांनी आपल्या मुलांना राजकारण सोडण्याचा सल्ला देत कुटुंबीयांशी राजीनाम्याबाबत चर्चा केल्याचेही सांगितले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी हे ट्विट केले आहे. 

त्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पार्थ पवार यांनी अजित पवार यांनी मला राजकारण सोडण्याचा सल्ला दिला आहे. ते राजकारण सोडणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला पार्थ पवार उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Parth Pawar tweet about Ajit Pawar resignation