
विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, शरद पवार तातडीने पुण्यात दाखल
विधान परिषद निवडणुकीची सध्या राज्यभरात धामधूम सुरू आहे. विविध पक्षाचे नेते त्यामुळे आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीच्या इच्छेने धाव घेत आहेत. त्यातून आता कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाची विधान परिषदेवर वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. आतापर्यंत भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केलीय. आणि आज सहाव्या जागेसाठी भाजप उमेदवार देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
शिवसेना आणि काँग्रेसनेही प्रत्येकी दोघांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असूनही राष्ट्रवादीने कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
राष्ट्रवादीच्या गोटातून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट घेतली. मात्र राष्ट्रवादीकडून अद्याप सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. त्यातच शरद पवार रात्रीच पुण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
हेही वाचा: रामराजे की खडसे? विधान परिषदेसाठी दोघेही शरद पवारांच्या भेटीला
विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस
राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही आपले उमेदवार जाहीर केले नाही
राष्ट्रवादीकडून विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा होती
त्यात शिवाजीराव गर्जे, अमरसिंह पंडित हे देखील इच्छुक आहेत
पक्षात निंबाळकर आणि खडसे यांच्या उमेदवारी बाबत नकारात्मक सूर असल्याची राष्ट्रवादीच्या वर्तुळात चर्चा
त्यामुळेच विधानं परिषद उमेदवारी घोषित करण्यास विलंब होतोय का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे
Web Title: Ncp Leader Sharad Pawar To Declare Candidates For Mlc Election 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..