Video : पाच दिवसानंतर संधी मिळताच श्रीनिवास पाटील मराठा आरक्षणावर गरजले

सचिन शिंदे
Tuesday, 22 September 2020

मराठा समाजामधील तो असंतोष अधिक तीव्र आहे. याचे कारण म्हणजे अशा प्रकारची स्थगिती कोणत्याही राज्याने दिलेल्या आरक्षणाला किंवा केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कोट्यास दिली नाही.

कऱ्हाड : मराठा समाज आरक्षणाचा लढा सनदशीर मार्गाने लढत आहे. केंद्र सरकारने सक्रिय सहकार्याने या लढ्यास बळ द्यावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली. लोकसभेत सोमवारी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून खासदार पाटील यांनी विस्तृत बेंचपुढील सुनावणीत केंद्र सरकारने याचिकाकर्ते होऊन महाराष्ट्र सरकार व मराठा समाजाच्या सोबत उभे राहावे, अशी भूमिका मांडली.
 
मराठा समाजाने शांततामय मार्गाने केलेल्या संघर्षाची आठवण खासदार पाटील यांनी केंद्र सरकारला करून दिली. ते म्हणाले,"" मराठा समाज आरक्षणाचा लढा सनदशीर मार्गाने लढत आहे. केंद्र सरकारने सक्रिय सहकार्याने लढ्यास बळ द्यावे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नऊ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये एसईबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिले होते. याला मुंबई उच्च न्यायालयाने देखील वैध ठरविले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत हे प्रकरण विस्तृत बेंचकडे सोपविले आहे.

ग्रामस्थांचा विराेध झुगारुन माझी आई काळुबाई चित्रीकरण ठेवले हाेते सुरु

माझी आई काळुबाई चित्रिकरणाची चाैकशी हाेणार ?
 
मराठा समाजामधील तो असंतोष अधिक तीव्र आहे. याचे कारण म्हणजे अशा प्रकारची स्थगिती कोणत्याही राज्याने दिलेल्या आरक्षणाला किंवा केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कोट्यास दिली नाही. परंतु, केवळ महाराष्ट्र सरकारने दिलेल्या एसईबीसी कोट्यास अशा प्रकारे स्थगिती मिळाल्याने असंतोषात भर पडली आहे. गायकवाड आयोगाने मराठा आरक्षणाच्या संदर्भाने अभ्यास व संशोधन करून आरक्षणाची शिफारस केली होती. या अहवालाचा आधार घेऊनच महाराष्ट्राच्या विधिमंडळाने दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मंजूर केले. याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने यात किरकोळ सुधारणा सुचवित आरक्षण कायम ठेवले. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता केंद्र सरकारचा या प्रकरणी हस्तक्षेप आवश्‍यक आहे.''

मराठा आरक्षणप्रश्नी नोटीस देऊनही वेळ न मिळल्याने या खासदारांचे पंतप्रधानांना पत्र!

प्रतिसरकार चळवळीतील शेवटचा दुवा निखळला; सोपानराव घोरपडे यांचे निधन

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Shrinivas Patil Speech In Loksabha On Maratha Reservation Satara News