Sunil Tatkare:'मुंबईतून ना मदत ना रसद'; सुनील तटकरे यांचा नागपुर दौरा, कार्यकर्ते नाराज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतरही विदर्भातील नेत्यांना रसद वा कुठलीच मदत दिली जात नसल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळत चालला आहे.
Sunil Tatkare:'मुंबईतून ना मदत ना रसद'; सुनील तटकरे यांचा नागपुर दौरा, कार्यकर्ते नाराज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतरही विदर्भातील नेत्यांना रसद वा कुठलीच मदत दिली जात नसल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळत चालला आहे.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे विदर्भात प्रथमच आगमन होत आहे.

पाच नोव्हेंबरला ते नागपूर येथे बैठक घेणार आहेत. येथूनच्या त्यांच्या विदर्भ दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. मात्र याच दिवशी नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे मोजकेच प्रतिनिधी बैठकीला येणार असल्याचे समजते. विदर्भाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने शरद पवार यांच्या नेतृत्वातही राष्ट्रवादी वाढण्याऐवजी कमकुवत होत गेली. तोच कित्ता अजित पवार यांची राष्ट्रवादीसुद्धा गिरवित आहे. चारपाच महिन्यांतच अनेकांना त्याचा प्रत्यय येऊ लागला.

सेना-भाजपच्या महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. यात गडचिरोलीचे धर्मराव बाबा आत्राम या विदर्भातील एकमेव आमदाराचा समावेश आहे. अजित पवार गटाने नव्याने कार्यकारिणी तयार केली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे संपूर्ण विदर्भाची जबाबदारी दिली आहे. असे असले तरी प्रदेशातील नेते विदर्भातील फारसे लक्ष घालत नाही आणि रसद पोहचवत नसल्याने सुरुवातीला दिसलेला उत्साह आता मावळत चालला आहे. (Latest Marathi News)

Sunil Tatkare:'मुंबईतून ना मदत ना रसद'; सुनील तटकरे यांचा नागपुर दौरा, कार्यकर्ते नाराज
Pune ISIS Module Case : NIAची मोठी कारवाई! पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात आठव्या संशयित दहशतवाद्याला अटक

ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून विदर्भात पक्षाचे खाते उघडण्याची संधी असताना मुंबईतून कोणीच पुढाकार घेतला नाही. आर्थिक मदतसुद्धा दिली नाही. त्यामुळे पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार ग्रामपंचायत उभा करण्यात आलेला नाही. काही लाभाचे पद मिळेल या आशेने अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात सहभागी झाले आहेत.

मात्र बडे नेते विदर्भात लक्ष घालत नाही आणि मुंबईत भेटायला गेल्यावर प्रतिसाद दिला जात नसल्याने अनेकांमध्ये नाराजी आहे. एका प्रदेश कार्यकारिणीत असलेल्या नेत्याला एका नेत्याने भेटीचे वेळ दिली होती. मात्र मुंबईत गेल्यानंतर संबंधित नेता भेटला नाही आणि फोनवरून प्रतिसादही दिला. महत्त्वाच्या कामाने भेटता आले नाही हे सांगण्याचेही सौजन्य दाखवण्यात आले नसल्याचे समजते. (Latest Marathi News)

Sunil Tatkare:'मुंबईतून ना मदत ना रसद'; सुनील तटकरे यांचा नागपुर दौरा, कार्यकर्ते नाराज
Road Accident : कर्नाटक राज्योत्सव मिरवणुकीनंतर घरी परतताना काळाचा घाला; तीन अपघातांत 2 ठार, 9 जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com