Jitendra Awhad: CM शिंदेंविरोधात अपशब्द वापरल्यामुळं NCP नेत्याला होणार अटक, आव्हाडांना आधीच कळली बातमी!

आनंद परांजपे यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता
Jitendra Awhad
Jitendra AwhadEsakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. त्यांच्या बोलण्यामुळे शिंदे गटाची शिवसेना आक्रमक झाली होती. शिंदे गटाच्या समर्थकांनी ठाण्यातील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. या तक्रारींवरून आनंद परांजपे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. यामुळे आनंद परांजपे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबधी परांजपे यांना आज रात्रीच अटक करण्यात येणार असल्याचं ट्विट आव्हाड यांनी काल रात्री केलं आहे.

ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या तक्रारी आता FIR मध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. त्या दखलपात्र गुन्ह्यात घेतल्या आहेत. आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे. आपल्या राज्याची वाटचाल आता पोलीसी राज्याकडे होऊ लागली कि काय? अशा प्रकारची शंका आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. तर अटक कराच, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Jitendra Awhad
Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

काय म्हणाले होते आनंद परांजपे

मुख्यमंत्री ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणार आहे, असं आनंद परांजपे म्हणाले होते. तर ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गु्न्हे दाखल केले तेच खरे गुन्हेगार आहेत, आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या. कोणाची बदनामी त्यातून केली नाही, असंही आनंद परांजपे म्हणाले आहेत.

Jitendra Awhad
Ajit Pawar : "... ही राष्ट्रवादीची शिवसेना!" जयंत पाटलांना सावरायला अजित पवार सरसावले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com