esakal | राजू शेट्टींचे नाव वगळले? अजित पवार यांनी दिलं स्पष्ट उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

राजू शेट्टींचे नाव वगळले? अजित पवार यांनी दिलं स्पष्ट उत्तर

राज्यपाल नियुक्त आमदार निवडीतून तांत्रिक कारणामुळे शेट्टी यांना वगळण्यात आल्याच्या चर्चेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता पसरली आहे.

राजू शेट्टींचे नाव वगळले? अजित पवार यांनी दिलं स्पष्ट उत्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीने हेमंत टकले यांचे नाव दिले असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीत राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यासाठीचे पत्र दिल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

राज्यपालांकडे दिलेल्या यादीतील 12 आमदारांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह काहींची नावे वगळल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता, पवार यांनी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. पुण्यात बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. तसंच पुढे असेही म्हणाले की, राज्य सहकारी बँकेच्या संबंधितांवर ईडी तपास यंत्रणेकडून छापे टाकण्यात आल्याची बातमी एका चॅनेलने दाखवली. परंतु ही बातमी धादांत खोटी, निराधार होती. अशा निराधार बातम्यांमुळे प्रसारमाध्यमांबाबत जनतेच्या मनातील असलेली विश्वासार्हता कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकी सध्या डोक्यात नाही. यादीतून आपल्याला वगळले याबाबत अद्याप अधिकृत कळवले नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. राज्यपाल नियुक्त आमदार निवडीतून तांत्रिक कारणामुळे शेट्टी यांना वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. पूरग्रस्तांना न्याय देण्याच्या मागणीसाठी शेट्टी यांचे सध्या आंदोलन सुरू आहे.

हेही वाचा: आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल- भाजप नेत्या

हेमंत टकले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विश्वासातले आहेत. पवारांचे निष्ठावंत अशीही त्यांची ओळख असून २००८ ते २०१४ आणि २०१४ ते २०२० या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

loading image
go to top