
मविआ सरकारनं लादलेल्या कोरोना निर्बंधाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री अनभिज्ञ?
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं (MVA govt) नुकतीच कोरोनाची नवी नियमावली (new corona guidelines) जाहीर केली. पण या नियमावलीबाबत सरकारमधील काही मंत्रीच अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचाही समावेश आहे. त्यांनी खुद रात्री जाहीर झालेल्या निर्बंधांची आपल्याला माहिती नव्हती, असं सांगितलं आहे. (NCP minister unaware of Corona restrictions imposed by Maharashtra govt)
हेही वाचा: जीम, ब्युटी पार्लर आणि सलूनसाठी अटींसह परवानगी; राज्य सरकारचे नवे आदेश
आव्हाड म्हणाले, "मला निर्बंधांबाबत जास्त काही माहिती नाही, रात्री जाहीर केलेत असं काहीतरी समजतंय. मी सकाळपासून माझ्या कामात होतो, व्यापात होतो. फक्त आज रात्रीपासून निर्बंध लागणार आहेत अशी माहिती मला मिळाली आहे. या सगळ्या निर्णय प्रक्रियेत गृहनिर्माण मंत्री म्हणून आपलं काम करतो आहे. ओमीक्रॉन हा काही सत्ताधारी पक्षात जाणार आणि विरोधी पक्षात जाणार नाही असं नाही. तुम्हाला विश्वासात घेतले म्हणजे ओमीक्रॉन कमी होणार आणि विश्वासात घेतलं नाही तर ओमीक्रोन वाढणार असंही नाही"
सध्याचं राजकारण खूप घाणेरडं!
सध्याच्या घडीला राजकारण खूपच खालच्या पातळीवर गेलं आहे. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यामध्ये जो मनाचा मोठेपणा आम्ही पहिला तो आता राहिलेला नाही. मी एवढे मोर्चे पाहिले पण माझ्या घरावर मोर्चा काढला जातो. यामुळं घरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, असं सांगत सध्या खूप घाणेरडं राजकारण सुरू असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Web Title: Ncp Minister Unaware Of Corona Restrictions Imposed By Maharashtra Govt
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..