Ajit Pawar: आमदार अपात्रतेप्रकरणी सप्टेंबरमध्ये सुनावणी! अजित पवार, समर्थक आमदारांना नोटीस; ‘शिवसेना’ प्रकरणीही कोर्टाचे आदेश शक्य

sharad pawar ajit pawar
sharad pawar ajit pawar esakal
Updated on

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ३ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याच दिवशी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरही सुनावणी घेण्यात येईल. ही दोन्ही प्रकरणे सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहेत. त्यावर एकापाठोपाठ एक सुनावणी होईल, असे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज दिले. सोमवारच्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या ४१ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

sharad pawar ajit pawar
Eknath Shinde: मोठी बातमी! अजित पवारांशिवाय लढण्यासाठी शिंदेंचा प्लॅन रेडी? राष्ट्रवादीकडे असलेल्या 'या' आठ मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमले

‘अजित पवार यांच्यासह ४१ आमदांराना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र घोषित करायला हवे होते,’ अशी याचिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने दाखल केली आहे, तर ‘विधानसभा अध्यक्षांनी शरद पवार गटाच्या १३ आमदारांना अपात्र ठरवायला हवे होते,’ अशी याचिका ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्यावतीने अनिल पाटील यांनी दाखल केली आहे. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे.बी.पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन त्यावर अजित पवार यांच्यासह ४१ आमदारांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्यास सांगण्यात आले.

sharad pawar ajit pawar
Video: पेन ड्राईव्ह बॉम्ब! ''चित्रा वाघचे कारनामे...'' विद्या चव्हाणांचा इशारा; उद्या ३ वाजता पत्रकार परिषद

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या अशाच प्रकारच्या याचिकांवर ३ सप्टेंबर रोजी सुनावणी होईल. त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या याचिकांवरही एकापाठोपाठ एक सुनावणी होईल, असे आदेश सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले. या प्रकरणांची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी व्हावी की सर्वोच्च न्यायालयात? याचाही निर्णय ३ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

संगणकनिर्मित तारखांमुळे संभ्रम
आजच्या सुनावणीनंतर संगणकनिर्मित तारखांनुसार ‘शिवसेना’ प्रकरणी ३ सप्टेंबरऐवजी ६ ऑगस्ट रोजी, तर ‘राष्ट्रवादी’ प्रकरणी १७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर नेमकी कधी सुनावणी होणार? हे आजच्या सुनावणीचा आदेश संकतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

पक्ष, चिन्हांबाबत ऑगस्टमध्ये सुनावणी
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह’ प्रकरण न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे प्रलंबित असून त्यावर ६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे तर ‘शिवसेना पक्ष आणि चिन्ह’ प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे प्रलंबित असून त्यावर १४ ऑगस्टला सुनावणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Marathi News Esakal
www.esakal.com