जयंत पाटील म्हणतात, दोन दिवसांत सगळं सुरळीत होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

सर्वकाही दोन दिवसांत सुरळीत पार पडेल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून काही माहिती नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच माहिती देवू शकतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप काही ठरलेली नाही. मात्र, शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांत पूर्ण होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यात महाविकासआघाडी सरकारचा शपथविधी पार पडून आठवडा उलटला असला तरी अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर अद्याप एकाही मंत्र्याला खातेवाटप झालेले नाही. हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये  होत आहे. त्यापूर्वी हे खातेवाटप होण्याची शक्यता आहे. यावर जयंत पाटील यांनीही शिक्कामोर्तब केले आहे.

कांदा महागलाय; काय आहेत किचनमधील 'ऑप्शन्स'

सर्वकाही दोन दिवसांत सुरळीत पार पडेल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून काही माहिती नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच माहिती देवू शकतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Jayant Patil talked about cabinet portfolio in Maharashtra