Manipur Violence : "वापर करून टाकून दिलं, मारहाणीनंतर भाजप आमदाराच्या पत्नीचा आरोप"; आव्हाडांचं ट्वीट

Manipur Violence
Manipur Violenceesakal
Updated on

मणिपूरमध्ये मागील काही महिन्यांपासू जातीय हिंसाचार उफाळून आला आहे. यादम्यान राज्यात दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला आणि देशात खळबळ उडाली. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मणिपूरमधील एका भाजप आमदाराबाबत केलेल्या ट्वीटने चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या आमदार पांगळे होऊन हॉस्पिटलात पडलेत पण त्यांना पहायला एकही भाजप नेता गेला नाही असे आव्हाड म्हणाले आहेत.

"भाजपाचे तीनवेळा आमदार, मणिपूरचे विद्यमान आदिवासी कल्याण मंत्री आणि कुकी समाजाचे नेते विंगझुगिन माल्ते आज पांगळे होऊन हॉस्पिटलात पडलेत. दंगेखोर मैतेईंनी लोखंडी सगळ्यांनी त्यांना मारहाण केली. भाजपचा एकही नेता त्यांना पहायला गेलेला नाही. "वापर करून झाल्यावर आम्हाला टाकून दिलं", असं त्यांची पत्नी म्हणतेय" असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

Manipur Violence
Sharad Pawar News: केजरीवाल शरद पवारांच्या भेटीला! केंद्राच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मोर्चेबांधणी?

दरम्यान मणिपूरमधील स्थितीवर संसदेत चर्चा व्हावी यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळत आहेत. विरोधकांकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला मणिपूर मुद्द्यावर कोंडी केली जात आहे.त्यामुळं अनेकदा दोन्ही सभागृहांची कामकाज बंद करावं लागलं होतं.

तसेच मणिपूर च्या मुद्द्यावर आपचे खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यांना वारंवार सभापतींनी आवाहन करुनही त्यांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला, त्यामुळं सभापतींनी त्यांना थेट संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित केलं आहे. यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाल्याचे पाहयला मिळालं. त्यानंर आप आणि इतर पक्षातील काही खासदारांनी संसद परिसरात आंदोलनाचा पवित्रा घेतला.

Manipur Violence
Devendra Fadnavis News : शिंदे सरकारचा 'तो' निर्णय रद्द करण्याची फडवणीसांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.