Rohit Pawar: "सत्तेत येण्याआधी..."; ईडीचं नवं टार्गेट असलेल्या रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar-Rohit-Pawar
Rohit Pawar: "सत्तेत येण्याआधी..."; ईडीचं नवं टार्गेट असलेल्या रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Rohit Pawar: "सत्तेत येण्याआधी..."; ईडीचं नवं टार्गेट असलेल्या रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

राज्यातल्या अनेक नेत्यांच्या मागे ईडी हात धुवून लागली आहे. त्यात आता रोहित पवारांची ही भर पडली आहे. रोहित पवार संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. रोहित पवारांसह राकेश वाधवान हेही या कंपनीच्या संचालकपदी होते.

याच चौकशीवरुन आता रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, "जे कोणी यंत्रणा मला बोलावतील. आधीही सहकार्य केलं आहे. आधीही अशा यंत्रणांनी मला, माझ्या अधिकाऱ्यांना बोलावलं आहे. सत्तेत येण्याच्या पाच वर्षे आधीसुद्धा सीआयडीसह इतर संस्थांनी माझी, माझ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. तेव्हा जसं सहकार्य केलं, तसंच सहकार्य आत्ताही करेन, असं आश्वासन देतो".

हेही वाचा: रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? ग्रीन एकर कंपनीची 'ईडी'कडून चौकशी सुरू

ईडीला मिळालेल्या तक्रारीनुसार, रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. २००६ ते २०१२ या काळात रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठवले गेले आणि देशात आले, याची चौकशी करा, अशी तक्रार ईडीला मिळाली होती. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती कंपनीने लपवून ठेवल्याचेही आरोप आहेत.

Web Title: Ncp Mla Rohit Pawar Ed Enquiry First Reaction I Will Co Operate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..