
Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर रोहित पवारांची सदस्य म्हणून निवड
मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. आजोबांपाठोपाठ नातवाचीही क्रिकेटच्या मैदानात एंट्री झाली असून रोहित पवार हे असोशिएशनचे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला असून असोशिएशनच्या कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली असून अध्यक्षपदी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Viral Video : चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत अशा पोहचतात; मुलांनी शिकवलाय धडा
आजोबांपाठोपाठ नातूही क्रिकेटच्या मैदानात
शरद पवार यांनीसुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. तर भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनमध्ये रोहित पवारांची एंट्री झाली आहे.