Monsoon Session: ‘राष्ट्रवादी’चे आमदार अधिवेशनात हजेरीसाठीच उपस्थित; द्विधा मनःस्थितीमुळे बहुतांश सदस्यांची कामकाजाकडे पाठ?

अजित पवार गटाचे नऊ मंत्री सोडले तर बहुतांश आमदारांनी विधानसभा, विधानपरिषदेच्या कामकाजात सहभाग घेण्यास टाळाटाळ
Monsoon Session
Monsoon SessionEsakal

सत्तेत सामील झाल्यानंतरच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नऊ मंत्री सोडले तर बहुतांश आमदारांनी विधानसभा, विधानपरिषदेच्या कामकाजात सहभाग घेण्यास टाळाटाळ केली आहे.

राष्ट्रवादीचे ८० टक्के आमदार विधानभवनात फक्त हजेरीसाठी येतात. मात्र, अजूनही दोन्ही पवार गटाची स्पष्ट भूमिका नसल्याने सर्व आमदारांची द्विधा मनःस्थिती असल्याचे समजते. त्यामुळे, कामकाजात सहभाग होण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र विधानभवनात दिसते आहे.

Monsoon Session
Uddhav Thackrey: 'शिवसेनेने खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादीनं काय खुपसलं? ती का फोडली?', ठाकरेंचा सवाल

सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे बहुतांश आमदार विधानभवनात येऊन हजेरी लावल्यानंतर सभागृहाच्या बाहेर मंत्र्याच्या दालनात मतदारसंघांतील कामांचा पाठपुरावा करण्याकरिता वेळ घालवतात तर काही आमदार मंत्रालयात आपला मोर्चा वळवतात.

अजूनही राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावे, यासाठी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर काही आमदारांना निधी मिळण्याचे समाधान असले तरी सत्ताधारी भाजपसोबत बसून विरोधकांचा वैचारिक सामना कसा करायचा, याचीही चिंता असल्याने सभागृहात बसण्याचे बहुतांश आमदार टाळतात, असे काही आमदारांनी ‘सकाळ’शी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Monsoon Session
Sharad Pawar: शरद पवारांना सोलापूरमध्ये मोठा धक्का! बड्या नेत्याच्या मुलाचा अजितदादांच्या गटात प्रवेश

आमदारांची द्विधा मनःस्थिती

राज्यात सर्व मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा वर्गही मोठा आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या कामाचा आवाका व सत्तेत असल्याने मतदारसंघांत मिळणारा निधी याचीही जाणीव त्यांच्या गटातील आमदारांना आहे. त्यामुळे नेमका कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला नाही, यावरून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मोठी अडचण झाली आहे.

काही आमदारांनी ‘सकाळ’शी बोलताना नेमके कोणाच्या बाजूने गेल्यानंतर आपला राजकीय मार्ग योग्य राहील, हे पूर्णपणे कळत नाही. आमची नक्की द्विधा मनःस्थिती झाली आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Monsoon Session
Manipur Violence: अत्याचार थांबेना! मणिपूरमध्ये बीएसएफ जवानाकडून महिलेचा विनयभंग; घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com