NCP-MNS Photo War I काही फोटो चांगलेही असतात अन् खरेही, मनसे-राष्ट्रवादीत रंगलं फोटोवॉर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत जुन्या आठवणींचे फोटोवॉर रंगलं आहे.

काही फोटो चांगलेही असतात अन् खरेही, मनसे-राष्ट्रवादीत रंगलं फोटोवॉर

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने अनेक घडामोडी घडत आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली. यानंतर राज्यकर्त्यांनी एकमेकांवर अनेक आरोकपप्रत्यारोप केले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खरमरीत शब्दात टीका केली. एरव्ही शरद पवारांकडे सल्ला मागण्यासाठी जाणाऱ्या राज यांनी अचानक घेतलेली ही भूमिका पाहून अनेकांनी भूवया उंचावल्या. मात्र भोंगा आणि हनुमान चालिसा पठणाच्या विषयावरून मनसे आक्रमक झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. दरम्यान, आता मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत जुन्या आठवणींचे फोटोवॉर रंगलं आहे. नेटेकरांच्याही यावर कमेंट येत आहेत.

हेही वाचा: 'भाजप एक गमतीशीर पक्ष, कोणत्या गोष्टीचा इव्हेंट करतील भरवसा नाही'

दरम्यान, आता राष्ट्रवादीच्या आमदार अमोल मिटकरी यांनीही एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी शरद पवार आणि राज ठाकरे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. आधारवड, पवार साहेब!, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. हा फोटोत राज ठाकरे शरद पवार यांना आदराने स्टेजवर धरून नेत असतानाचा आहे. यातून मिटकर यांनी टोला लगावला आहे. काही फोटो चांगले ही असतात आणि खरेही, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, मनसेने शरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांचे काही फोटो शेअर केले आहेत. आता त्यावर उत्तर म्हणून आमदार मिटकरींनी राज ठाकरेंचा शरद पवारांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा: संभाजीराजे छत्रपतींची राजकीय कारकीर्द सांगते; 'त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही'

काय आहे नेमक हे फोटोवॉर प्रकरण?

'कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है.' असं म्हणत मनसेचे सचिन मोरे यांनी शरद पवार, बृजभूषण सिंह आणि सुप्रिया सुळे यांचे एका कार्यक्रातील फोटो शेअर केले आहेत. हे मनसेने शेअर केलेले हे फोटो २०१८ च्या कुस्ती स्पर्धेतील आहेत. मावळमध्ये झालेल्या या स्पर्धेतील हे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी ते त्यांच्या फेसबुकवर शेअर केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनसे-राष्ट्रवादी यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर आज मनसेच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे खासदार बृजभूषण यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमधून राज ठाकरेंविरोधात शरद पवारांनीच रसद पुरवली असा अप्रत्यक्ष आरोप मनसेने केला. आता मनसेने फोटो शेअर केल्यानतंर राष्ट्रवादीने यावरून टीका केली आहे. दरम्या या संदर्भात राष्ट्रवादीनेही फोटो शेअर करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

Web Title: Ncp Mns Photo War Amol Mitkari Criticized Mns Share A Photo Sharad Pawar And Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top