Parliament Session 2022 : छत्रपती शिवराय आणि राज्यपालांचा विषय काढताच अमोल कोल्हेंचा माईक केला बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Kolhe
Parliament Session 2022 : छत्रपती शिवराय आणि राज्यपालांचा विषय काढताच अमोल कोल्हेंचा माईक केला बंद

Parliament Session 2022 : छत्रपती शिवराय आणि राज्यपालांचा विषय काढताच अमोल कोल्हेंचा माईक केला बंद

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच काही भाजपा नेते गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. यावरुन विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. हाच मुद्दा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत उपस्थित केला, मात्र त्यावेळी त्यांचा माईक बंद केल्याचं समोर आलं आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी हा अनुभव एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्ववीटरवरुन शेअर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी कोल्हे करत होते. पण त्यावेळी त्यांचा माईक बंद करण्यात आला. या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे म्हणाले, "आज संसदेत शून्य प्रहरामध्ये, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार जी अवमानजनक वक्तव्य होतायत, त्यासंदर्भात कायद्याची तरतूद करण्यात यावी, जेणेकरून कोणालाही अशी हिंमत करता येणार नाही, या मागणीसाठी वेळ मागितला होता, दिलाही होता. पण दोन ते तीन वाक्यांनंतरच माझा माईक बंद करण्यात आला."

या घटनेविषयीची आपली भूमिका मांडताना अमोल कोल्हे म्हणाले, "अशा प्रकारे माईक बंद केला तरी शिवभक्तांच्या भावना आणि त्या भावनांचा आवाज बंद करता येणार नाही. तो कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची कोणाचीही छाती होऊ नये, मग तो माणूस संविधानिक पदावर असो किंवा कोणत्याही जबाबदार पदावर असो, कोणाचीही कोणत्याही महापुरुषांचा अपमान करण्याची हिंमत होऊ नये. यासाठी संसदेने कायद्याची तरतूद करावी अशी माझी मागणी आहे."

टॅग्स :Amol KolheDr Amol Kolhe