Bharat Jodo Yatra: कॉंग्रेसला राष्ट्रवादीचा रसद! राहुल गांधींच्या वेगाने सुप्रिया सुळेंचा पदयात्रेत 'वॉक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP MP Supriya sule jitendra awhad Jayant patil joinc congress bharat jodo yatra Nanded  news

Bharat Jodo Yatra: कॉंग्रेसला राष्ट्रवादीचा रसद! राहुल गांधींच्या वेगाने सुप्रिया सुळेंचा पदयात्रेत 'वॉक'

नांदेड : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात आज चौथा दिवस असून राज्यात १४ दिवस यात्रा प्रवास करणार आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व नेते पदायात्रेत सहभागी झाले आहेत. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी यात्रेत सहभाग नोदवला. यादरम्यान आज यात्रा राहुल गांधीची पण हवा मात्र सुप्रिया सुळेची झाल्याचे पाहायला मिळालं. यावेळी सुप्रिया सुळे राहुल गांधी यांच्या वेगाने चालताना दिसून आल्या.

यात्रेत राहुल गांधी यांनी दुपारी चालायला सुरूवात केली आणि मध्येच सुप्रिया सुळे राहुल गांधी यांच्या पुढे चालायला लागल्याचे पाहायला मिळालं. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेल्या लोकांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या हात हलवत नमस्कार करत चालत होत्या आणि राहुल गांधी मात्र मागे असे चित्र यात्रेत पाहायला मिळाले. त्यामुळे यात्रा राहुल गांधी यांची पण हवा मात्र सुप्रिया सुळे यांची असं चित्र होतं.

हेही वाचा: MNS On Sanjay Raut: सावरकर, टिळक स्वातंत्रसैनिक; तुमच्यासारखे…; मनसेची राऊतांवर चहुबाजुने टीका

हेही वाचा: Honda EM1 e: शाळा-कॉलेजात जाण्यासाठी होंडाची परफेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहे खास वाचा

आज राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यात्रेत सहभागी झाले आहेत. दरम्यान राहुल गांधी यांच्या या यात्रेला महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या पदयात्रेचा आज 64 वा आणि महाराष्ट्रातला आज चौथा दिवस आहे. महाराष्ट्रात ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर मधून 7 नोव्हेंबर रोजी भारत सुरू झाली आहे.