Honda EM1 e: शाळा-कॉलेजात जाण्यासाठी होंडाची परफेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहे खास वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

honda em1 e electric scooter information revealed know all details

Honda EM1 e: शाळा-कॉलेजात जाण्यासाठी होंडाची परफेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहे खास वाचा

सध्या इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी होंडा आपल्या अनेक इलेक्ट्रिक उत्पादनांवर काम करत आहे. कंपनीने नुकतेच सांगितले की ते 2025 पर्यंत भारतीय बाजारपेठेत किमान 10 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहेत. यापैकी पहिली इलेक्ट्रिक स्कूटरचे EICMA 2022 मध्ये अनावरण करण्यात आले, ज्याला कंपनीने Honda EM1 e असे नाव दिले. हे इलेक्ट्रिक स्कूटर मोपेडसारखे दिसते. या इलेक्ट्रिक स्कूटरबाबत काही माहिती समोर आली आहे, चला जाणून घेऊया..

92% चार्जिंगवर देते 59km रेंज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर Honda Mobile Power Pack असेल, म्हणजेच या स्कूटरची बॅटरी काढता येईल. तथापि, कंपनीने बॅटरीच्या क्षमतेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, मोपेड एका चार्टमध्ये 40 किमीची रेंज देण्यास सक्षम असू शकते. ही स्कूटर 92% चार्जिंगवर 59km ची रेंज देण्यास सक्षम असल्याचे सूचित करणारा एक व्हिडिओ कंपनीने जारी केला आहे.

हेही वाचा: boAt ने लॉंच केली कॉलिंग फिचर असेलेली स्मार्टवॉच; जाणून घ्या खास फीचर्स

Honda EM1 e मध्ये असेल हब-माउंट मोटर

कंपनीने त्याच्या पॉवर ट्रेनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, जरी तिचा फोटो पाहिल्यानंतर पाहता Honda EM1 e मध्ये हब-माउंट मोटर वापरली जाईल असे दिसून येते. याशिवाय 10-इंच रिअल आणि 12-इंच फ्रंट व्हील्स असतील. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सामान ठेवण्यासाठी मोठे लगेज रॅक असतील. समोर, तुम्हाला डिस्क ब्रेक आणि टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क दिसेल. यामध्ये पुढील आणि मागील बाजूस एलईडी लाइट्स देखील मिळतील.

हेही वाचा: Xiaomi 13 Series: पुढील आठवड्यात लॉंच होऊ शकते शाओमी13 सीरीज; काय असेल खास वाचा

खास तरुणांसाठी केलं डिझाइन

तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन ही इलेक्ट्रिक स्कूटरची रचना करण्यात आल्याने ही इलेक्ट्रिक स्कूटर तरुणांना आकर्षित करेल, असे होंडाचे म्हणणे आहे. कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही स्कूटर अतिशय किफायतशीर ठरू शकते. 2023 पर्यंत युरोपमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू केली जाऊ शकते. जागतिक स्तरावर लाँच झाल्यानंतर ते भारतीय बाजारपेठेतही लॉन्च होईल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Electric Scooter