Mumbai : राष्ट्रवादीची निवडणुकीची तयारी; पवारांकडून २३ लोकसभा मतदारसंघाचा आढावा

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या आढावा बैठका आज पार पडल्या
NCP preparations Lok Sabha election review 23 Lok Sabha constituencies sharad Pawar
NCP preparations Lok Sabha election review 23 Lok Sabha constituencies sharad Pawarsakal

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मधे लढलेल्या २३ लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवस आढावा घेतला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या आढावा बैठका आज पार पडल्या. आगामी लोकसभा निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून एकत्रित सामोरे जाण्याचा निर्धार तिन्ही पक्षांनी केला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला २०१९ प्रमाणे सर्वच्या सर्व जागा येणार नाहीत. मात्र, पक्षाचे संघटन आणि या मतदारसंघातील नेते आणि पदाधिकारी यांच्या भूमिका या बैठकीत जाणून घेण्यात आल्या.

NCP preparations Lok Sabha election review 23 Lok Sabha constituencies sharad Pawar
Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन! पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभेसाठी 'या' नेत्यांची निवड?

दरम्यान, सर्वच्या सर्व २३ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आणि संघटन असल्याचे चित्र स्थानिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नसल्याने पक्षचिन्हावरील पक्षाची ताकद स्पष्ट करणे शक्य नसले तरी ग्रामपंचायत निवडणुका आणि बाजार समित्यांचे कौलावरून आढावा घेण्यात येत आहे.

आजच्या आढावा बैठकीत कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर-पूर्व, भंडारा, गोंदिया, जळगाव व रावेर, बुलडाणा, रायगड, मावळ, बारामती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी लढत झालेल्या मतदारसंघातील सद्य:स्थिती तर भाजपशी झालेल्या लढतींचा आकडेवारीनुसार आढावा घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या जागावाटपात तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत या आढावा बैठकांचा आधार महत्त्वाचा ठरेल.

NCP preparations Lok Sabha election review 23 Lok Sabha constituencies sharad Pawar
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा ‘मेगा प्लॅन’ ; पक्षाचे २२५ नेते घेणार सभा ; ८० कोटी लोकांपर्यंत पोचणार

उद्यापासून काँग्रेसच्या बैठका

लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचे सत्र काँग्रेसमधेही सुरू होत आहे. काँग्रेसने २०१९ मध्ये लढलेल्या २५ जागांवरील पक्षाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत जागावाटप करताना कोणत्या जागावर ठाम भूमिका घ्यायची यावर या बैठकीत चर्चा होणार असून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com