विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - मराठी - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काल एका कार्यक्रमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठं भाष्य केलं. त्यामुळे त्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियातून दखल घेण्यात आली. त्यांच्या त्या वक्तव्याची चर्चाही झाली.त्यावरुन त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले होते. गोखले यांनी अभिनेत्री कंगना राणावतनं केलेल्या बेताल वक्तव्याचे समर्थन केले होते. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून चिघळलेल्या एस टी संपाविषयी आणि शिवसेना भाजप युतीविषयी टिप्पणी केली होती. यासगळ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विक्रम गोखले यांनी केलेली वक्तव्ये चर्चेत आली आहे. ते म्हणाले होते की, कंगनानं देशाच्या स्वातंत्र्याविषयी जे वक्तव्य केलं ते बरोबर आहे. त्याला माझे समर्थन आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या व्यक्तींनी बलिदान दिलं त्यापासून त्यांना रोखता आले असते. मात्र त्यावेळच्या काही नेत्यांमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवरही गोखले यांनी वक्तव्य केले. भाजप आणि शिवसेना यांनी येत्या काळात एकत्र यायला हवे. काळाची ती गरज आहे. राज्याच्या भवितव्यासाठी त्यांनी एकत्र येणं महत्वाचे आहे. असे गोखले म्हणाले होते.

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

गोखले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असं मला वाटत नाही. असे लोक समाजात असतात. महाविकास आघाडी सरकारविषयी बोलताना पवार यांनी सांगितलं की, आम्ही जर ठरवून घेतलं आहे की जुळवून घ्यायचं त्यामुळे हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल उद्या जाईल दिवस मोजायचं काम त्यांना करावं लागेल. महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: कंगनाच्या स्वतंत्र्याबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचे केले विक्रम गोखलेंनी समर्थन; पाहा व्हिडीओ

हेही वाचा: विक्रम गोखलेंची 10 धक्कादायक वक्तव्यं...; एकदा वाचाच

loading image
go to top