एक दिवस आधीच शरद पवारांकडून यशवंतरावांना अभिवादन I Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwantrao Chavan

दरवर्षी 25 नोव्हेंबरला ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या पुण्यतिथीला शरद पवार उपस्थित राहून अभिवादन करतात.

एक दिवस आधीच शरद पवारांकडून यशवंतरावांना अभिवादन

कऱ्हाड (सातारा) : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधी स्थळी अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांची उद्या (ता. 25) पुण्यतिथी आहे. त्या निमित्त आजच पवार यांनी येथील त्यांच्या समाधी स्थळी अभिवादन केले. त्यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार, देवराज पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा: चौथ्यांदा विजयी होऊनही घार्गे कोल्हापूरच्या तुरुंगात..

दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या पुण्यतिथीला शरद पवार उपस्थित राहून अभिवादन करतात. मात्र, यंदा एक दिवस आधी येवून त्यांनी अभिवादन केले. महाबळेश्वर येथे कार्यक्रमासाठी ते काल रात्रीच साताऱ्यात आले होते. 25 नोव्हेंबरला अन्य ठिकाणी कार्यक्रम नियोजित असल्याने पवार यांनी आज चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं.

हेही वाचा: वडिलांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत सुपुत्राचा पराभव

loading image
go to top