
Anil Deshmukh: अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येताच राष्ट्रवादी करणार जंगी स्वागत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार आहेत. देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (NCP reaction on Anil Deshmukh Release)
देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.
हेही वाचा: winter assembly session 2022: शिंदे - फडणवीस सरकारच्या सत्ताधारी आमदारांनीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन
हेही वाचा-जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
त्यामुळे आता अनिल देशमुख लवकरच बाहेर येणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांच स्वागत करण्यासाठी जंगी तयारी केली असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
ते म्हणाले की, "हा विजय भारतीय राज्यघटनेचा, संविधानाचा आणि न्यायदेवतेचा आहे. त्यामुळे सर्व आरोप करणारे लोक आज कुठे आहेत, असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. आता सर्व गोष्टी स्पष्ट होणार असून लवकरच 'दूध का दूध, पानी का पानी' होईल.
ज्या बिनबुडाच्या आरोपांमध्ये अनिल देशमुख यांना गोवण्यात आले ते सगळे आरोप आता आम्ही जनतेच्या दरबारी मांडू आणि अनिल देशमुख साहेबांचे जंगी स्वागत करू" त्यामुळे आता अनिल देशमुख जेल मधून बाहेर येणार याचा आनंद संपूर्ण पक्षाला झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता देशमुख यांच कसं स्वागत केल जाणार हे पाहवं लागेल.