Devendra Fadnavis : इजा कानाला नव्हे तर मनाला, म्हणून आज…; राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना चिमटा

Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra FadnavisSakal

शिवसेनेने राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रात दिलेल्या 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची जाहिरातीमुळे पाजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या जाहिरातीवरून विरोधकांनी टीका केल्यानंतर शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीमध्ये बदल करण्यात आला. आता याबदलेल्या जाहिरातीवरून देखील विरोधकांनी निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. कालच्या या जाहिरीतीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला होता. फडणवीसांनी कानाचा त्रास झाल्याने हा दौरा रद्द केल्याचं सांगण्यात आलं. मात्र रोहित पवारांनी हा इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती असा टोला लगावला आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Raj Thackeray Birthday : जास्त आरडाओरडा करू नका, माझा नातू…; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना फटकारलं

"इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी." असे रोहित पवार म्हणाले आहेत.

तसेच त्यांनी "असो! सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय... यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय.. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का?" असा सवाल देखील रोहित पवारांनी विचारला आहे.

शिवसेनेने दिलेल्या जाहिराती
शिवसेनेने दिलेल्या जाहिराती

फडणवीस नाराज आहेत?

तर जाहिरात प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काल आणि आजचे दौरे त्यांच्या रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे.फडणवीस यांचे आज काही दौरे ठरले होते.मात्र हे सगळेच दौरे रद्द करण्यात आले आहेत.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Jay Shri Ram in School : शाळेत 'जय श्रीराम' घोषणा; दहावीच्या ६ विद्यार्थ्यांच्या निलंबनवरून पालक संघटना आक्रमक

सभा रद्द होण्याचं नेमकं कारण काय?

डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे ते मोठ्या सभा आणि विमान प्रवास फडणवीस टाळत असल्याची माहिती देण्यात आली आहे. आजची अकोल्याची सभा तसेच उद्या आयोजित करण्यात आलेल्या धारशिवमधील सभेला देखील देवेंद्र फडणवीस जाणार नाहीत.

विमानप्रवास टाळण्यासाठी दोन्ही सभा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यांना कानाचा त्रास होऊ लागल्यामुळे विमान प्रवास करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यामुळेच फडणवीस काल कोल्हापूर येथील कार्यक्रमाला गेले नव्हते. आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठका आयोजित केल्या आहेत. .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com