Ajit Pawar: राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवारांच्या भेटीला; देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक

ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चा आणि घडामोडींवरून अनेक अंदाज बांधले जात आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. अजित पवार खुद्द काका शरद पवार यांच्याविरोधात बंड करून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा रंगली होती. या प्रकरणी द इंडियन एक्प्रेसमध्ये वृत्त देखील होते.

ajit pawar
Karnataka Election : चित्रा वाघांसमोरच रडले खासदार अन्‌ उमेदवार; भाजप कार्यकर्त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा

या पार्श्वभूमीवर मंगळवार दुपारी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. आणि या सगळ्या चर्चांना पुर्ण विराम दिला, ते म्हणाले माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम होतंय. माझ्यासंदर्भात ज्या बातम्या दाखविण्यात येत आहेत. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगत पवारांनी ‘राजकीय भूकंपा’च्या चर्चेला पूर्णविराम दिला.

मात्र राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थक नेते प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांची अजित पवार यांच्या सोबत गुप्त बैठक एका हॉटेल मध्ये बैठक झाल्याची चर्चा आहे.

तसेच छगन भुजबळ आणि आमदार अनिल पाटील अजित पवारांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर गेले आहेत. अजित पवार आणि भुजबळ यांच्यासह अनेक जेष्ठ नेते देखील या बैठकीत असल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र अजून पर्यंत समजू शकलं नाही कोण नेते देवगिरीवर उपस्थित आहेत.

ajit pawar
MLA Nitesh Rane यांच्याकडून कोकणात सरपंच निवडीसाठी मोठी ऑफर

दरम्यान आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत आणि भविष्यातही राहणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या सभेत मी बोललो नाही तर बातम्या होतात. मात्र बाळासाहेब थोरात बोलले नाही तर बातम्या होत नाहीत. माझ्यावर एवढ प्रेम उतू चाललं का. तुम्हाला आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असे अजित पवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com