Shashikant Shinde new NCP State chief : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.