
Sharad Pawar : शरद पवारांची वारकऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक; नेमका प्रकार काय?
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज वारकऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मागील काही दिवसांपासून राजकारणासाठी वारकऱ्यांना टार्गेट करण्याचे प्रकार घडले आहेत. त्याच अनुषंगाने ही बैठक होती.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हीडिओ मागे व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओनंतर राज्यभरात आरोप-प्रत्यारोप झालेले. त्या व्हीडिओमध्ये सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांबद्दल विधान केलं होतं. सुषमा अंधारे यांना सत्ताधारी पक्षाकडून आणि काही वारकरी मंडळींकडून प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.
या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवार आज शरद पवार आणि वारकऱ्यांमध्ये एक बैठक पार पडली. राजकारणासाठी वारकऱ्यांचा सुरु असलेला वापर थांबवावा आणि वारकरी साहित्याचा खरा प्रचार व्हावा, असं पवार या बैठकीमध्ये म्हणाल्याचं कळतंय.
'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या बैठकीतला एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये शरद पवार यांच्यासोबत काही मंडळी बसल्याचं दिसून येत आहे.