Rohit Pawar ED Enquiry : शरद पवार रोहित पवारांच्या पाठिशी! पुन्हा जाणार ईडी कार्यालयात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने बुधवारी (ता. २४ जानेवारी) हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Rohit Pawar ED enquiry
Rohit Pawar ED enquiry
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने बुधवारी (ता. २४ जानेवारी) हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांची चौकशी केली जाणार आहे. यादरम्यान आज (२३ जानेवारी) रोजी रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत या चौकशीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बुधवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात रोहित पवार चौकशीसाठी जाणार आहेत. यावेळी आपण ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील सोबत येणार असल्याचेही रोहित पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या मागे शरद पवाप खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे. रोहित पवारांनी "या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!" असेही रोहित पवार म्हणाले आहेत.

Rohit Pawar ED enquiry
Clash in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर दोन गटांत तुफान दगडफेक, १३ गंभीर; पोलिसांकडून अश्रुधूर, बळाचा वापर

रोहित पवार काय म्हणालेत?

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली की - "ED कार्यालयात उद्या (बुधवार दि.२४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ED ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!

माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!"

Rohit Pawar ED enquiry
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केलं 101 किलो सोनं! सुरतमधील 'हा' व्यापारी आहे तरी कोण?

दरम्यान रोहित पवारांनी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला असल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीकडून रोहित पवारांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा काही संबंध होता का? याविषयी ही चौकशी होणार आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी शरद पवार यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. शरद पवार अगदी तत्परतेने ईडीच्या कार्यालयात पोहचले होते. आता शरद पवार पुन्हा एकदा रोहित पवारांसोबत ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

Rohit Pawar ED enquiry
Ram Mandir Darshan : अयोध्येतील मंदिर आजपासून दर्शनसाठी खुलं! भाविकांची पहाटेपासून तुफान गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com