भाजपचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

गेल्या पंधरा दिवसांत आमच्याकडून अनेक आमदार आमच्याशी संपर्क साधत आहेत. आमच्याकडून चूक झाल्याचे सांगत आहेत. खासगीत सगळेच कबूल करत आहेत. अशा आमदारांना परत यायचे झाले तर त्याठिकाणच्या निष्ठावंतांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल.

मुंबई : भाजप इतर राज्यांप्रमाणे येथेही आमदार पळवेल असे वाटत होतं. पण, तसे होणार नाही. भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असा गोप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांत आमच्याकडून अनेक आमदार आमच्याशी संपर्क साधत आहेत. आमच्याकडून चूक झाल्याचे सांगत आहेत. खासगीत सगळेच कबूल करत आहेत. अशा आमदारांना परत यायचे झाले तर त्याठिकाणच्या निष्ठावंतांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल. कोणतेही प्रकल्प थांबणार नाहीत, भाजपकडून जो गैरसमज पसरविण्यात येत आहे तसे काही होणार नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त प्रकल्प करू.   

शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...

किमान समान कार्यक्रमावर आमची बैठक झाली असून, वरिष्ठ नेत्यांना या बाबतचा अहवाल दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व घटकांना सामावून घेणारे यामध्ये मुद्दे आहेत. आजच यावर चर्चा करणे योग्य नाही. भाजपकडे 105 जागा आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे काही गोळा केल्या आहेत. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावे. आम्हाला पाच वर्षे सरकार टिकवायचे आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे थोडासा वेळ लागेल, असे पाटील यांनी सांगितले.

'105 किंकाळ्या' आणि वेड्यांचा घोडेबाजार; शिवसेनेचा वार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP state president Jayant Patil says BJP MLAs in touch with NCP