Supriya Sule: अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह टीकेवर सुप्रिया सुळेंचं भाष्य, म्हणाल्या… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp supriya Sule reaction on abdul sattar offensive language maharashtra politics

Supriya Sule: अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह टीकेवर सुप्रिया सुळेंचं भाष्य, म्हणाल्या…

शिंदे फडणवीस सरकारमधील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. मात्र, सत्तारांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना एका शिवीचा वापर केल्या होता, यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना या टीकेवर बोलण्यास नकार दिला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर मी काहीही बोलणार नाही असे म्हटले आहे. या संपुर्ण प्रकरणावर मी बोलणार नाही, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. दरम्यान सत्तार यांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: Abdul Sattar: खोक्याच्या टीकेवरुन सत्तारांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंना शिवीगाळ!

सत्तारांना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार.... झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ, असे विधान केले.

हेही वाचा: Chitra Wagh: सत्तारांच्या विधानानंतर चित्रा वाघ यांना आठवली कंगना रणौत

दरम्यान, सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत असे विधान केल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच शिवसेनेचे नेते आक्रमक झाले असून सत्तार यांनी २४ तासांत आपले शब्द मागे घ्यावेत, असा अल्टिमेटम राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :Abdul SattarSupriya Sule