Maharashtra Politics : "आज भाच्याने सगळ्यांना 'मामा'बनवलं"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला

NCP Suraj Chavan tweet congress satyajeet tambe balasaheb thorat nashik graduate election
NCP Suraj Chavan tweet congress satyajeet tambe balasaheb thorat nashik graduate election

नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिकची ही जागा कॉंग्रेसला देण्यात आली होती मात्र उमेदवारी जाहीर झालेली असताना देखील सुधीर तांबे यांनी आज अर्ज भरला नाही. तर सत्यजीत तांबे यांनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यामुळे राजकीय क्षेत्रात वेगळ्याच चर्चेला उधाण आलं.

काँग्रेसकडून जाहीर झालेल्या उमेदवाराने अर्ज भरला नाही आणि त्यांचाच मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून वेगळीच खेळी खेळली. यामुळे राजकीय वर्तुळात कॉंग्रेसची मात्र गोची झाल्याचं दिसून आलं. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी राजकीय स्थितीवर खोचक ट्वीट केलं आहे.

NCP Suraj Chavan tweet congress satyajeet tambe balasaheb thorat nashik graduate election
Graduate Constituency Election : 'मामा'लाच मामा बनवलं! बाळासाहेब थोरात विरुध्द तांबे संघर्ष पेटणार?

सगळेच 'मामा'

कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे हे मामा-भाचे आहेत. तांबे यांनी मामा बाळासाहेब थोरात तसेच कॉंग्रेसला विश्वासात न घेता उमेदवारी अर्ज भरला. यावर नाव न घेता खोचक शब्दत टिप्पणी करत सूरज चव्हाण यांनी "आज भाच्याने सगळ्यांना "मामा"बनवलं." असं म्हटलं आहे.

NCP Suraj Chavan tweet congress satyajeet tambe balasaheb thorat nashik graduate election
Video : अमृता फडणवीसांपुढे माधुरीही फिकी! नवीन डान्स व्हिडीओ एकदा पाहाच

फडणवीसांशी छुपी मैत्री

आजच्या राजकीय नाट्यादरम्यान सत्यजीत तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या छुप्या मैत्रीची देखील चर्चा जोरदार चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांनी अनुवादीत केलेल्या एका पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांची जाहीर स्तुती केली होती.

पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर फडणवीस भाषण करण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी व्यासपीठावरील बाळासाहेब थोरात यांना उद्देशून फडणवीस म्हणाले होते की, सत्यजितसारख्या नेत्यांना किती दिवस बाहेर ठेवणार? त्यांना जास्त वेळ बाहेर ठेवू नका, नाहीतर आमचे त्यांच्यावर लक्ष आहे, यामुळे सत्यजीत तांबे फडणवीसांशी जवळीक साधणार अशी चर्चा होती.

NCP Suraj Chavan tweet congress satyajeet tambe balasaheb thorat nashik graduate election
Viral Video : कोयता गँगची ऐसी तैसी! आता पुणेकरांनीच हातात घेतला दंडूका

सत्यजीत तांबे काय म्हणाले?

सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारी भरल्याने ते देवेंद्र फडणवीसांची ऑफर स्विकारणार काय? अशी देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र या सर्व प्रकरणावर सत्यजीत तांबे यांनीच पुढे येत भूमिका स्पष्ट केली.

तांबे म्हणाले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमची यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. किंबहुना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवावी. परंतू तांत्रिक कारणामुळे डॉ.सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे, अशी भूमिका स्पष्ट केली.

NCP Suraj Chavan tweet congress satyajeet tambe balasaheb thorat nashik graduate election
Dasun Shanaka Run Out : नाट्य शेवटच्या षटकातलं…. रोहित होता म्हणून शानकाचं झालं शतक

भाजपचं म्हणणं काय?

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा मागितला तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करु असे विधान केले आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे हे भाजपकडे मदत मागून त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करु शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com