Video : अमृता फडणवीसांपुढे माधुरीही फिकी! नवीन डान्स व्हिडीओ एकदा पाहाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadanvis new dance video  on song aaj mein ne mood bana liya hai hookstep challenge viral video

Video : अमृता फडणवीसांपुढे माधुरीही फिकी! नवीन डान्स व्हिडीओ एकदा पाहाच

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या नव्या गाण्यामुळे सध्या चर्चेत आहेत.अमृता फडणवीस यांचं आज मैने मूड बना लिया है... हे पंजाबी गाणं प्रदर्शित झालं आहे. ते व्हायरल होताच त्यावर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करणं सुरु केले आहे.यादरम्यान त्यांच्या डान्सचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

अमृता फडणवीस यांनी स्वत: हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता स्वत: गायलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या चाहत्यांना या गाण्यावर रील्स बनवण्याचं चॅलेंज दिलं आहे.

हेही वाचा: Mumbai Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार, चार जखमी

अमृता फडणीवस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये तुम्ही काय करू शकता ते आम्हाला दाखवा! #MoodBanaleya हुकस्टेप चॅलेंज घ्या आणि गाण्याचे हॅशटॅग वापरून तुमची स्वतःची रील तयार करा आणि त्यात आम्हाला टॅग कर असे अवाहन यांनी केले आहे.

हेही वाचा: Sunil Shetty : बॉलिवूडचे स्टार मूग गिळून गप्प, सुनील शेट्टी मात्र बोलला; थेट योगींना सुनावलं…

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झालेल्या त्यांच्या गाण्याला चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अमृता फडणवीस यांच्यावर चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या नव्या गाण्याचीच सर्वत्र चर्चा होती. त्यांचे हे पहिलेच पंजाबी गाणे आहे. गाण्याचा ट्रेलर व्हायरल झाला तेव्हापासून त्या गाण्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती.