गोपीचंद पडळकर यांनी धनगर आणि धनगड याची केंदातून दुरुस्ती करुन आणावी... पुढची जबाबदारी माझी (video)

अशोक मुरुमकर
Thursday, 25 June 2020

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वकत्याने पेटलेले राजकारण काही केल्या कमी होताना दिसत नाही. भाजपने कालच असं वक्तव्य करणं चुकीचे असल्याचे म्हटलं आहे.

सोलापूर : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वकत्याने पेटलेले राजकारण काही केल्या कमी होताना दिसत नाही. भाजपने कालच असं वक्तव्य करणं चुकीचे असल्याचे म्हटलं आहे. पडळकरांच्या वक्व्याबाबत वेगवेळ्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून निषेध केला जात आहे. सोशल मीडियावर देखील याचे पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीही याचा समाचार घेतला आहे. असाच समाचार उत्तमराव जानकर यांनी घेतला असून त्यांनी म्हटलं की, मी भूमिका मांडली तर पडळकर भाजपमध्ये राहणारही नाहीत.

आमदार पडळकर यांनी बुधवारी शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य गेले. त्यानंतर राज्यभर राजकारण पेटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच सोलापुरात बोलताना असं वक्तव्य चुकीचं असल्याचे म्हटल होतं. राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, भडक विधान करुन आपल्या प्रसिद्धी दिले जाते. म्हणून करणे चुकीची आहेत. धनगर आणि धनगड याची दुरुस्ती पडळकर यांनी केंद्र सरकारकडून करुन आणावी. महाराष्ट्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी करुन घेण्याची जबाबदरी मी घेतो. अशी विधान आम्हालाही करता येतात. आरक्षण देतो म्हणणाऱ्या मोदींना आम्हालाही दगलबाज म्हणता येते, देवेंद्र फडणवीसांना भामटा म्हणता येतं परंतु ते आमच्या संस्कृतीत बसत नाही, अशी विधान करुन लोकप्रियता मिळवणं चुकीचे आहे. धनगर आरक्षणाचा विषय हा केंद्राच्या अख्यारितला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात हा प्रश्‍न आहे. तो विषय मी माझ्या हातात घेतला आहे. तो ४-६ महिन्यात सोडवू. पडळकारांची ऐवढी ताकद आहे तर त्यांनी केंद्रातून प्रश्‍न सोडवून आणावा. मी याबाबतची भूमीका ८-१० दिवसात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे. परंतु पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाशी जी बेईमानी केली केली ती मांडल्यानंतर पडळकरही भाजपात राहणार नाहीत, याची मला खात्री आहे. 

कोण आहेत जानकर
उत्तमराव जानकर यांनी माळशीरस मतदारसंघातून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी कै. हनुमंत डोळस हे सुमारे ७००० मताने विजयी झाले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा सुमारे अडीच हजार मताने पराभव झाला होता. शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. येथे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आदी प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. माळशीरस मतदारसंघात आमदार राम सातपुते हे भाजपचे उमेदवार होते. त्यांच्या विजयासाठी मोहिते पाटील यांनी ताकद लावली होती. लोकसभा निवडणूकीवेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता. येथे प्रत्यक्ष उमेदवार जानकर व सातपुते असले तरी ही निवडणूक पवार विरुद्ध मोहिते पाटील अशीच असल्याचे सर्वत्र चित्र होते. राष्ट्रवादीला माळशीरसमधून मोहिते पाटील यांना प्रभावी विरोध करणारा उमेदवार हवा होता. जानकर हे कायम मोहिते पाटील यांच्या विरोधातील होते. त्यामुळे राष्ट्रवादीने जानकर यांच्या विजयासाठी ताकद लावली होती, असं या भागातील नागरिक सांगत आहेत. मात्र त्यांचा सुमारे अडीच हजार मताने पराभव झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Uttamrao Jankar challenges BJP MLA Gopichand Padalkar