Nitesh Rane : वाद चिघळला! आता दीड फुटाचा आमदार, म्हणत राष्ट्रवादीने पुन्हा डिवचलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar and Nitesh Rane

Nitesh Rane : वाद चिघळला! आता दीड फुटाचा आमदार, म्हणत राष्ट्रवादीने पुन्हा डिवचलं

Nitesh Rane : भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यावर विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत नितेश राणेंची (Nitesh Rane) खिल्ली उडवली होती. त्यानंतर नितेश राणे आक्रमक झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला.

हेही वाचा: Supriya Sule : सुप्रिया सुळे सकाळीच पोहोचल्या सिंहगड किल्ल्यावर; राष्ट्रवादीकडून...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता टीका केली. चव्हाण म्हणाल्या की, राज्यात महागाई वाढली आहे. महागाई कमी करा. कुठे दीड फुटाचा आमदार असतो, त्याची जीभ तीन फुटाची आहे. अरे टीका करण्याआधी तुमच्या मतदार संघातील प्रश्न सोडवा, असा टोला विद्या चव्हाण यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता लगावला.

हेही वाचा: Sharad Pawar : विरोधकांच्या ऐक्यासाठी राहुल यांच्या पदयात्रेची मदत होईल; पवारांचं सूचक विधान

सध्या लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. भगवा रंग आणता. चव्हाण म्हणाल्या की, मी देहूला गेले होते. त्यावेळी तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं बॅनर लावण्यात आलं होतं. त्यात मोदीजी चिपळ्या घेतलेले आणि तुकाराम महाराजांच्या वेशात दिसून आले, हे ढोंग कशासाठी? जे १० लाखांचा सुट घालतात, पाच लाखांचा बूट वापरतात, त्यांनी संत तुकारामांचा वेश धारण करून देहूच्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न केल्याची टीका चव्हाण यांनी केली.

याआधी अजित पवार यांनी नितेश राणे यांचा उल्लेख टिल्ल्या असा केला होता. त्यामुळे नितेश राणे संतप्त झाले होते. तसेच त्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं होतं.