'चंद्रकांत पाटील साहेब जेवणाचे आमंत्रण देते, सहकुटुंब अवश्य या' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

'बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगते, माय होऊनी जगाची नाळे वाट जगविते'

'चंद्रकांत पाटील साहेब जेवणाचे आमंत्रण देते, सहकुटुंब अवश्य या'

ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि भाजपतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पहायला आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत भाष्य करताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती. त्यावरून आता राष्ट्रवादीतील नेतेमंडळींकडून चंद्रकांत पाटलांवर टीकेची झोड उठवली जात आहे.

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनीही आता चंद्रकांत पाटलांना कानपिचक्या दिल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात चव्हाण यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. त्या म्हणतात, बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगते, माय होऊनी जगाची नाळे वाट जगविते. चंद्रकांत पाटील तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देते. सहकुटुंब अवश्य या, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.

हेही वाचा: मालिका क्षेत्रातील अभिनेत्री विदीशा मुजूमदारचा धक्कादायक मृत्यू

काय म्हणाले आहेत चंद्रकांत पाटील?

मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं, असा सवाल केंद्र सरकारला विचारणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर पाटील म्हणाले की, कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा इतका विचार करत नाही असे म्हटले होते.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भाषेवरून भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत, हा सर्व महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुप्रिया यांच्याबद्दल बोलत आहेत, मी मानत आलो आहे की, ते (भाजप) स्त्रियांचा द्वेश करणारे आणि त्यांना शक्य असेल तेथे खाली खेचणारे आहेत...मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे जी घर सांभाळणारी, एक आई आणि एक यशस्वी राजकारणी, तसेच अनेक मेहनती आणि गुणवान महिलांपैकी आहे, असे म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे.

हेही वाचा: इम्रान खान यांच्या राज्यात अराजक कायम, इस्लामाबादेत लष्कर तैनात

Web Title: Ncp Vidya Chavan Criticized To Chandrakant Patil On Statement Supriya Sule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top