मालिका क्षेत्रातील अभिनेत्री विदीशा मुजूमदारचा धक्कादायक मृत्यू, घरीच आढळला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालिका क्षेत्रातील अभिनेत्री विदीशा मुजूमदारचा धक्कादायक मृत्यू

अभिनेत्री नागरबाजारजवळ एका अपार्टमेंटमध्ये तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती.

मालिका क्षेत्रातील अभिनेत्री विदीशा मुजूमदारचा धक्कादायक मृत्यू

मालिका क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पल्लवी डे हिच्या नुकत्याच घडलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण मालिका क्षेत्रावर शोककळा पसरली होती. दरम्यान, ही घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालिका क्षेत्रातील मॉडेल-अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणारी विदीशा मजुमदार हिचा मृतदेह तिच्या घरामध्ये आढळून आला आहे. 21 वर्षाची असणारी ही अभिनेत्री नागरबाजारजवळ एका अपार्टमेंटमध्ये तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती.

हेही वाचा: कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या, ईडीने दाखल केला गुन्हा

काल (बुधवार) सायंकाळी या तरुण अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमधील एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा मालिका क्षेत्रावर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याचे बोलले जात आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला असून अभिनेत्रीची हत्या झाली की आत्महत्या हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस या घटनेसंदर्भातील तपास करत असून तिच्या जवळील सर्व मित्र-मैत्रिणींकडून आणि नातेवाईकांकडून अधिकची माहिती गोळा केली जात आहे. सध्या प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांनी अजूनह कोणताही अंदाज व्यक्त केलेला नाही. पोस्टमार्टम अहवालानंतर सत्य काय हे समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा: छगन भुजबळच ओबीसींना न्याय देऊ शकतात, सुप्रिया सुळेंकडून कौतुक

Web Title: Model Actress Bidisha De Majumdar Found Body At Her Apartment Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top