मुंबई - ‘एकल महिलांना सशक्त करण्यासाठी केवळ योजना नाही, तर ती त्यांच्यापर्यंत ठोस योजना करून त्या राबवाव्यात. एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करणे अत्यावश्यक आहे. अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या..राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नांवर विधानभवनात बैठक झाली. साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी एकल महिलांच्या सविस्तर समस्या मांडल्या. बैठकीस अपर मुख्य सचिव व्ही. राधा, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, निवासी महाराष्ट्र सदन आयुक्त आर .विमला आदी उपस्थित होते..डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘एकल महिलांची संख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५४ लाखांवर आहे. त्यामुळे एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करणे अत्यावश्यक आहे. या महिलांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी त्यांच्या ओळखीची नोंदणी करून ओळखपत्र देणे गरजेचे आहे. यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळवता येईल.’.कोरोना काळात महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आता एकल महिलांच्या संदर्भात अधिक संघटित आणि प्रभावी उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा किंवा जनगणना यंत्रणेमार्फत एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याची शक्यता तपासण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.