राज्यातील साखर निर्यात कोटा वाढविण्याची गरज

संतोष शेंडकर
Saturday, 3 October 2020

कोरोनाच्या आपत्तीमुळे ज्या कारखान्यांची साखरनिर्यात खोळंबली आहे, त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. राज्यातील ५१ साखर कारखान्यांना याचा थोडाफार लाभ होणार आहे. कारखान्यांनी या निर्णयाबाबत फारसे समाधान व्यक्त न करता नव्या हंगामाचा निर्यात कोटा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, निर्यात केलेल्या साखरेचे अनुदानही त्वरित मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सोमेश्वरनगर - कोरोनाच्या आपत्तीमुळे ज्या कारखान्यांची साखरनिर्यात खोळंबली आहे, त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. राज्यातील ५१ साखर कारखान्यांना याचा थोडाफार लाभ होणार आहे. कारखान्यांनी या निर्णयाबाबत फारसे समाधान व्यक्त न करता नव्या हंगामाचा निर्यात कोटा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, निर्यात केलेल्या साखरेचे अनुदानही त्वरित मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने सन २०१९-२० या हंगामासाठी ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मार्चनंतर कोरोनाने निर्यातीत अडथळे निर्माण झाले. सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारला देशभरातून ५६ लाख टन साखर निर्यात झाल्याचे आणि आणखी १ लाख टन निर्यातीचे करार झाल्याचे दिसून आले. 

पुणेकरांनो, हॉटेलात जेवायला जाताय? मग 'अशा' प्रकारची काळजी घ्या!

तीन लाख टनांचे कोटे उरले होते. राज्यातील ५१ साखर कारखान्यांचे जवळपास दीड ते पावणेदोन लाख टन साखर निर्यात होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने डिसेंबरअखेर देशातील ३ लाख टन निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याने अतिरिक्त साखरसाठ्यातही घट होणार आहे.

शरद पवार संतापले; 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, यावर कवडीचा विश्वास राहिला नाही!'

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need to increase sugar export quota in the state