गाजर संशोधन समिती मुख्यमंत्र्यांनी स्थापन करावी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजर संशोधन समिती स्थापन करून, त्याचे अध्यक्षपद भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना द्यावे, अशी उपरोधिक टीका शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. मंत्रालयासमोरील "शिवालय' या पक्षकार्यालयात त्या बोलत होत्या. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ आश्‍वासने दिली आहेत, हे लक्षात आल्यावर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत ठिकठिकाणी फुकट गाजर वाटप केले जात आहे. या अभिनव आंदोलनाबाबत गोऱ्हे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, याबाबत त्यांनी समिती नेमावी आणि त्याचे अध्यक्षपद सोमय्या यांना द्यावे. यातून भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. 

राष्ट्रीय मराठा पार्टी 
राष्ट्रीय मराठा पार्टी हा अलीकडेच स्थापन झालेला नोंदणीकृत पक्ष आहे. या पक्षाने या निवडणुकीत शिवसेनेला काही मागण्यांच्या अटीवर जाहीर पाठिंबा दिला आहे. यामध्ये मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळवून देणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणे; बेळगाव, निपाणीसह संयुक्‍त महाराष्ट्र आदी मागण्यांचा समावेश आहे, अशी माहिती या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neelam gorhe mumbai