Ketaki Chitale: केतकीची थेट कंगनाशी तुलना, ठाकरे गटातील नेत्याने म्हटलं...

Neelam Gorhe on ketaki chitale over ncp jitendra awhad molestation accusations maharashtra politics
Neelam Gorhe on ketaki chitale over ncp jitendra awhad molestation accusations maharashtra politics

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून राजकीय नेत्यांकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विनयभंग झाला आहे का नाही याचा निर्णय कोर्ट देईल असं म्हटलं आहे.

विनयभंग झाला आहे का नाही याचा निर्णय कोर्ट देईल असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. जे समोर येईल त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत असं व्हिडिओ मध्ये दिसतंय असंही त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी या प्रकरणावर बोलताना, वैऱ्याची भावना राजकीय नेत्यांच्या मनात येऊ नयेत, तसेच जितेंद्र आव्हाड यांनी संतापून किंवा दुःखी होऊन राजीनामा देऊ नये असे म्हटले आहे.

मराठी अभिनेत्री केतकी चितळेने जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी माहणी केली आहे यावर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, केतकी चितळे हिच्या रूपाने महाराष्ट्रमध्ये मिनी कंगना राणावत जन्माला येते आहे, असे म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, राजकारणात एकमेकांच्या विरोधात हिन पातळीवरचे वाभाडे काढणे सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुका लागतील असं बोलेल तर त्यांच्यावर काही लोकांनी टीका केली असे त्या म्हणाल्या.

Neelam Gorhe on ketaki chitale over ncp jitendra awhad molestation accusations maharashtra politics
Jitendra Awhad: आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल

बाल दिनानिमित्त मुंबईत एका शाळेत कार्यक्रम ठरला होता तिथे मुख्यमंत्री उशिरा पोहचले. मुख्यमंत्री यांनी शाळेचे विद्यार्थी म्हणजे गुवाहाटीला ला नेलेले आमदार नाही हे लक्षात घ्यायला हवं असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. पुढे बोलताना ५० खोके वरुन बोलले तर एवढं का वाईट वाटतं, एका शिवसेना कार्यकर्त्याचा मला फोन आला होता ते त्यांना रुमाल भेट देणार आहेत, असेही गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

Neelam Gorhe on ketaki chitale over ncp jitendra awhad molestation accusations maharashtra politics
Jitendra Awhad: आव्हाडांवर अजून कलमं लावा…; वादात उडी घेत केतकी चितळेचं पोलिसांना पत्र

केतकी चितळे काय म्हणाली होती?

ठाण्यातील विवियाना मॉल येथे हर हर महादेव चित्रपटात्या शो दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य सर्व पूर्व नियोजित होते त्यामुळे त्यांच्यावर कलम 120 (ब) तसेच विनयभंग (354) ही कलमे लावण्यात यावी. अन्यथा, आम्ही हायकोर्टात दाद मागू अशी नोटीस केतकी चितळेने पोलिसांना पाठवली होती.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे कलम लावण्यात यावे. ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्यावेळी त्या व्यक्तीची पत्नीही तिथे होती. त्यांनाही मारहाण झाली. कलम 120 (ब) लावण्यात यावे, कारण मॉलमधील धूडगूस हा प्लॅनिंगचा भाग होता. ते सर्व प्री प्लॅन होते. हे जर केले नाही, तर आम्ही हायकोर्टात दाद मागू असे नोटीस मध्ये म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com