रिफायनरीच्या पर्यायी जागेबद्दल पालकमंत्र्याशी बोलावं लागेल - निलम गोऱ्हे I Neelam Gorhe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

कोकण आणि महाराष्ट्र प्रदूषित करणारा प्रवाह, शिवसेना आणि कोकणचं नातं खूप चांगलं

रिफायनरीच्या पर्यायी जागेबद्दल पालकमंत्र्याशी बोलावं लागेल - निलम गोऱ्हे

कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरणात अनेक चर्चा सुरु आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, स्थानिकांवर प्रकल्प लादनार नाही, असं मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. आमचा विकासाला विरोध नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही स्पष्ट केलं आहे. मात्र कोकण आणि महाराष्ट्र प्रदूषित करणारा प्रवाह तिथून वाहणार आहे. शिवसेना आणि कोकणचं नातं खूप चांगलं आहे. पर्यायी जाग्याबद्दल तेथील पालकमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल, असं मत महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा उपसभापतिपदी नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे.

यावेळी शिवसेना अभियानासंदर्भात त्या म्हणाल्या, स्थानिक पातळीवर मतभेद असतो. फेसबुकवरून हे सगळं प्रसारित करण्याचं काम चालू आहे. कार्यकर्त्यांनी समंजसपणा दाखवायला हवा, अर्थाचा अनर्थ करू नये. टक्केवारीची भाषा शिवसेनेची (Shivsena) नाही. गजानन किर्तीकर नेते आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्य बदल मी काही बोलणार नाही. कारण निधी राज्य सरकार देत असतं, असंही त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: राहुल गांधींकडे व्हिजन, 2024 ला ते पंतप्रधान होतील - नाना पटोले

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेबद्दल त्या म्हणाल्या, तानाजी सावंत यांनी जे मांडलं आहे त्यात अतिशयोक्ती केली आहे. न्याय संस्था काम करत आहे. शिवसेना नेत्यानंवर जी टीका केली त्यातून काही मिळाले नाही. मुख्यमंत्री यांना झोप लागणार नाही या किरीट सोमय्या यांच्या विधानावरून त्यांची सूडबुद्धी यातून दिसून येते. मुंबई महापालिकामध्ये त्यांचा ब्रह्मनिरास दिसेल. भाजपातील लोकांनी इतरत्र जाऊ नये म्हणून त्यांचं ढोंग सुरुआहे.

पंढरपूरमधील घन कचरा प्रलंबित होता तो पूर्ण झाला आहे. विठ्ठल मंदिरात सुधारणा करण्यासाठी ६ बैठक घेण्यात आल्या आहेत. पंढरपूरमध्ये शेगावसारखं उद्यान होण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला गती देण्यात येईल. एका भक्त निवासाचेही काम चालू आहे. संत विद्यापीठाची घोषणा झाली अजून सकारात्मक दृष्टीने लवकरच ते काम होईल, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा: कोकणात रिफायनरीला थारा नाही; प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम

रघुनाथ कुचीक यांच्या वक्तव्यावर त्या म्हणाले, यावर काही भाष्य करणार नाही. तपालामध्ये बोलून हस्तक्षेप होईल यासाठी मी बोलत नाही. त्या मुलीचा मुंबईत असताना मला फोन आला होता. पोलिसांकडे जाणार असल्याचं तिनं मला सांगितलं होतं. मी कोणताही दबाव टाकलेला नाही, योग्य ती कारवाई पोलिस करतील. पुण्यातील महिला अत्याचारांबद्दल त्या म्हणाल्या, २३ मार्च रोजी गृहविभाग, शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा केली होती. जिथे महिला शिकतात तिथे महिला होमगार्ड्स ठेवायची मागणी केली होती. सोशल मीडिया ग्रुप काढून माहिती घेण्यात हवी ही मागणीही होत आहे.

Web Title: Neelam Gorhe Says Refinery Location Discussion With Konkan Guardian Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..