राज्यात आज सर्वाधिक 3254 कोरोना रुग्णांची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 94, 041 वर..

corona
corona

मुंबई: आज राज्यात सर्वाधिक 3, 254 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील सर्वात मोठी ही आकडेवारी आहे. राज्यात हळूहळू लॉकडाऊन खोलण्यात आला आहे. त्यानूसार, लोक आता घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे, कोरोना रुग्णांचा आकडा आता वाढू लागला आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 94,041 झाली आहे. आज 1879 रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण 44,517 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  राज्यात आज एकूण 46, 074  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात 149 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असुन मृतांची संख्या 3 हजार 438 वर पोहचली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 3.65 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज 1,789 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून,  राज्यात आजपर्यंत 44 हजार 517 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47.34 टक्के एवढे आहे.

तसेच राज्यातील 149 मृत्यूंमध्ये आरोग्य मंडळ निहाय ठाणे 122, नाशिक 5, पुणे 10, औरंगाबाद 7, लातूर 1, अकोला 3, नागपूर 1 असे मृत्यू सांगण्यात आले. आजच्या मृत्यू नोंदीपैकी 94 पुरुष तर 55 महिला आहेत. यापैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 87 रुग्ण आहेत तर 49 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 13 जण 40 वर्षांखालील आहे. या 149 रुग्णांपैकी 104 जणांमध्ये ( 70%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 

कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 3, 438 झाली आहे. तर आजच्या एकूण मृत्यू नोंदीपैकी 66 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू 18 एप्रिल ते 6 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 83 मृत्यूंपैकी मुंबई 58, ठाणे 9, नवी मुंबई 5, जळगाव 4, उल्हासनगर 3, वसई विरार 2, अमरावती आणि गडचिरोली प्रत्येकी 1 असे मृत्यू सांगण्यात आले. 

दरम्यान आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 5,93, 784 नमुन्यांपैकी 94,041 नमुने पॉझिटिव्ह (15.71 टक्के ) आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट 3, 897झोन क्रियाशील असून आज एकूण 18, 384 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 67.65 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

new 3254 corona patients found in maharashtra today 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com