मुंबईत पुन्हा लागणार कडक लॉकडाऊन ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

पहिल्या दिवशी ज्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडलेत ते पाहून धाकधूक वाढली. घराबाहेर पडून आरोग्यासाठी व्यायामासाठी परवानगी दिलेली आहे.

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. कधी २ हजार, कधी अडीच हजार, कधी २ हजार ९०० तर कधी थेट ३ हजारांवर. अशात महाराष्ट्र सरकारकडून लॉकडाऊनमुळे रुतलेली राज्याची आर्थिक चाकं पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयन्त सुरु केलाय.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मिशन बिगिन अगेन सुरु करण्यात आलाय. मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊनच्या अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. अगदी रेड झोनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना सर्वात मोठा दिलासा मिळालाय तो म्हणजे सरकारकडून स्वतःच्या आरोग्यासाठी देऊ केलेली जॉगिंग, रनिंग किंवा चालण्याची परवानगी.

मोठी बातमी - जयंत पाटील यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत 'मोठं' आणि सूचक विधान, म्हणालेत...

दरम्यान सदर परवानगी मिळताच मुंबईकरांनी फिजिकल डिस्टंसिंग चे नियम धाब्यावर बसवून आणि काहींनी तर मास्कही न लावता घराबाहेर पडून दाखवलं. मुंबईतील मारिन ड्राईव्ह भागातील मोठ्या गर्दीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा फोटो नक्कीच काळजी वाढवणारा असाच होता. 

काय म्हणालेत मुख्यमंत्री ? 

याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलंय. महाराष्ट्रात ज्या प्रकारे टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू केला त्याचप्रकारे टप्प्याटप्प्याने, हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता  देखील आणली जाईल.

मोठी बातमी - ठाण्यात आणखी एका नगरसेवकाचा कोरोनानं घेतला बळी 

मात्र पहिल्या दिवशी ज्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडलेत ते पाहून धाकधूक वाढली. घराबाहेर पडून आरोग्यासाठी व्यायामासाठी परवानगी दिलेली आहे. घराबाहेर पडून आरोग्य खराब करायचं नाहीये. त्यामुळे अशीच गर्दी होत राहिली तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील. पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. दरम्यान तशी वेळ येणार नाही कारण महाराष्ट्रातील जनता नियमांचं पालन करेल अशी आशाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. 

if norms of physical distancing is not followed then once again lockdown will be implemented


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if norms of physical distancing is not followed then once again lockdown will be implemented