esakal | राज्यात 'या' महिन्यापासून सुरू होणार शैक्षणिक सत्र, UGCने दिले निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

UGC

राज्यात 'या' महिन्यापासून सुरू होणार शैक्षणिक सत्र, UGCने दिले निर्देश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील अकृषी विद्यापीठातील शैक्षणिक सत्र (academic session 2021) एकाचवेळी सुरू करण्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मानस आहे. यासाठी सर्व कुलगुरूंची बैठक घेण्यात आली असून हे सत्र एक ऑक्टोबर सुरू करण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)ने दिशानिर्देश काढले असून, कुलगुरूंचाही बैठकीत चर्चा झाली. (new academic session start from october in maharashtra)

हेही वाचा: 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

प्रत्येक विद्यापीठाचे स्वतःचे शैक्षणिक वेळापत्रक असते. त्यानुसार प्रवेश आणि शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे नमूद असते. मात्र, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून विद्यापीठांचे सत्र सातत्याने लांबत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक बदलले. यामुळेच बहुतांश विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा संपायच्या असून आणि उन्हाळी परीक्षा सुरू व्हायच्या आहेत. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियोजन करीत, हिवाळी परीक्षा वेळेत संपवित बहुतांश परीक्षांच्या निकालांचीही घोषणा केली आहे. तसेच २९ जूनपासून विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात करीत, अंतिम वर्षांच्या परीक्षाही संपल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाद्वारे सप्टेंबर महिन्यांपासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याचा मानस आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ऑक्टोबर महिन्यात सत्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यापीठांना शैक्षणिक सत्रांची सुरुवात करायची आहे.

प्रवेशाची प्रक्रिया ऑगस्टपासून!

नागपूर विद्यापीठाला सर्वप्रथम बारावीच्या निकालानंतर प्रथम वर्षांच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. याशिवाय विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल येताच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करावे लागणार आहे. यासाठी बराच कालावधी लागत असल्याने विद्यापीठाद्वारे पुढल्या महिन्यापासूनच प्रवेशाची प्रक्रिया राबविण्याची शक्यता आहे.

एआयसीटीईचे सत्र ऑक्टोबरपासून -

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी सेलद्वारे एमएचसीईटी राबविण्यात येते. अद्याप त्याबाबत तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायीक अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबण्याची शक्यता आहे. त्यातूनच या अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा मानस आहे.

loading image