'सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे ST कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ'

Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarteesakal
Summary

गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे वकिली देऊन चूक केल्याची भावना एसटी कर्मचारी कृती समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.

मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आता तरी तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. एसटी कृती समितीची राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर कामावर परत या ही साद कर्मचारी ऐकतील अशी आशा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कृती समितीची बैठक पार पडली. यामध्ये २२ एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यानतंर बोलताना एसटी कृती समितीचे सदस्य अजय गुजर यांनी गुणरत्न सदावर्ते यांची वकीली मागे घेतली असल्याची माहिती दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कृती समितीने दिली. अजय गुजर म्हणाले की, आम्ही २० डिसेंम्बरला संप मागे घेतला होता. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश अडचणी सोडवलेल्या आहेत. तसंच कर्मचाऱ्यांवर कारवाही होणार नाही असं आश्वासन मिळालेलं नाही. लवकरच बैठक घेऊन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारावर चर्चा होणार आहे.

Gunratna Sadavarte
शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांची वकिली मागे घेतल्याचं सांगतना अजय गुजर म्हणाले की,आम्ही नवीन वकील आम्ही नेमणार आहोत. कोर्टात हा लढा सुरू राहणार आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य राहील. सर्व कर्माऱ्यांनी ताबडतोब कामावर हजर राहावे अशी विनंतीसुद्धा गुजर यांनी केली.

गुजर यांनी सदावर्ते यांना आपण पत्र लिहिलं असून त्यात आता तुम्ही आमची बाजू मांडण्याची गरज नसल्याचं सांगितलं. आम्ही त्यांची वकील म्हणून नेमणूक करून मोठी चूक केली. आता चूक सुधारून नवीन वकील नेमले आहेत. वकिलाने न्यायालयात प्रश्न मांडायला हवेत. त्यांनी व्यवस्थित मांडले नाहीत. त्यामुळे म्हणून आम्हाला न्याय अजून मिळाला नाही. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सतीश पेंडसे हे नवीन वकील नेमले असल्याचं गुजर यांनी सांगितले.

Gunratna Sadavarte
ST STRIKE : शरद पवार, अनिल परब आणि कृती समितीची पत्रकार परिषद

एसटी कृती समितीचे सदस्य सुनिल निर्भवणे यांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर टीका करताना म्हटलं की, लोकं डिप्रेशनमध्ये आहेत म्हणतात, पण वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये असावेत. लोकांना भडकावण्याचं काम सुरु आहे, सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्यीची वेळ आली आहे. आता नोकरी गेलेल्यांची नोकरी वाचवण्याचं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com