Coronavirus: राज्यात कोविड टास्कफोर्सची होणार पुनर्रचना; आढावा बैठकीत महत्वाचा निर्णय

कोविडच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
Eknath Shinde
Eknath Shindeesakal

मुंबई : काहीवेळापूर्वी राज्यातील कोविडच्या परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नव्यानं कोविड टास्कफोर्स तयार करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते तसेच अधिकारी उपस्थित होते. (New Covid Taskforce to be set up in Maharashtra Imp decision taken in meeting)

Eknath Shinde
Coronavirus: पुणेकरांनो सावधान! दगडुशेठ गणपतीच्या दर्शनाला जाताये? मास्क जवळ बाळगा

सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत ठरल्याप्रमाणं राज्यात नव्यानं कोविड टास्कफोर्स स्थापन केलं जाणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात टास्कफोर्स स्थापन करण्यात आला होता. या नव्या टास्कफोर्समध्ये आणखी काही तज्ज्ञ डॉक्टरांचा तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.

Eknath Shinde
Adar Poonawala: अदर पुनावाला यांच्या अडचणीत वाढ; हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार

राज्यात कोविडची परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी आपण तयार आहोत का? याचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा राज्याच्या प्रमुखांना देण्यात यावा.

हे ही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

कोविडची जागतिक स्थिती तसेच राज्यात पुन्हा कोविडची परिस्थिती उद्भवली तर आपण सज्ज आहोत का? आपल्याकडे रुग्णालयात पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याची माहिती यावेळी देण्यात आली. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत विधानसभेत निवेदन देणार असल्याचंही कळतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com