मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठ पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध आठ जिल्ह्यांसाठी नव्या मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध आठ जिल्ह्यांसाठी नव्या मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्री अतुल सावे यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. पण त्यांच्याकडे हिंगोलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आणखी एका म्हणजे चंद्रपूरसोबतच गडचिरोलीचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा?

अमरावती – डॉ. अनिल बोंडे
पालघर – रवींद्र चव्हाण
भंडारा – डॉ. परिणय फुके
गोंदिया – डॉ. परिणय फुके
हिंगोली – अतुल सावे
वर्धा – चंद्रशेखर बावनकुळे
बुलडाणा – संजय कुटे
गडचिरोली – सुधीर मुनगंटीवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new guardian ministers appointed for eight districts after cabinet expansion