
Women Name Policy: राज्य सरकारनं गेल्यावर्षी सर्वांसाठी कागदपत्रांवर स्वतःचं पूर्ण नाव लिहिण्याचा नवा नियम लागू केला. यामध्ये स्वतःच्या नावापुढे आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव अशा पद्धतीनं नाव लिहावं असा हा नियम आहे. पण एखाद्या मुलीचा विवाह झाल्यानंतर या पॅटर्न प्रमाणं नाव लिहिण्यात अडचण येत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं आता फक्त विवाहित मुलींसाठी नवा लिहिण्याबाबत नवा जीआर सरकार काढण्याच्या तयारीत आहे.