

Mahavitaran Strike
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसात, शहरात सात दिवसात आणि ग्रामीण भागात १५ दिवसात नवे वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी वाट पहावी लागणार नाही, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
‘महावितरण’कडून मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात वीज पुरवठा सेवा दिली जाते. ग्राहकांना नव्या वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्जासोबत दाखलेही जोडता येतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अर्जाची व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ग्राहकाला शुल्क भरण्याची सूचना दिली जाते. ग्राहकाने पैसे भरले की, नवा मीटर जोडून ग्राहकाला वीज कनेक्शन दिले जाते.
सध्याची ही पद्धती अर्ज केल्यापासून नवे कनेक्शन दिल्याची यंत्रणेत नोंद होण्यापर्यंत पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक टप्प्यावर देखरेख करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना हमखास आयोगाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत नवी जोडणी मिळणार आहे.
३ ते ९० दिवसांत वीज जोडणी
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महानगरांसाठी तीन दिवस, शहरांसाठी सात दिवस आणि ग्रामीण भागात १५ दिवसात कनेक्शन देण्याची तरतूद केली. तरीदेखील जेथे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, त्यासाठी ही कालमर्यादा आहे. विजेचे खांब उभारून व तारा जोडून वीज पुरवठा उपलब्ध करण्यासारखी पायाभूत सुविधांची कामे गरजेची असतील, तर तेथे ९० दिवसात वीज जोडणी देण्याची कालमर्यादा आयोगाने निश्चित केली आहे. महावितरणच्या सुधारणांमुळे नवीन वीज कनेक्शन देण्याच्या कामात गतीमानता, पारदर्शकता येईल. नवे वीज कनेक्शन देताना अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून कोठे दिरंगाई झाली, नेमक्या कोणत्या टप्प्यावर विलंब झाला हे माहिती तंत्रज्ञानामुळे समजेल. ‘महावितरण’ची ही व्यवस्था १ जानेवारीपासून सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.