esakal | राज्यात पुन्हा मृतांची संख्या वाढली; कोल्हापूरमध्ये सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Death

सध्या राज्यात 17,68,119 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत, तर 9,315 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

राज्यात पुन्हा मृतांची संख्या वाढली; कोल्हापूरमध्ये सर्वाधिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सोमवारी (ता.३१) नवे रुग्ण आणि मृत्यूचा आकडा काहीसा नियंत्रणात आला होता. पण मंगळवारी (ता.१) रुग्णांचा आकडा नियंत्रणात असला तरी मृत्यूचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. मंगळवारी दिवसभरात 477 रुग्ण दगावले आहेत. तसेच दिवसभरात 14,123 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 57,61,015 झाली आहे. गेल्या 24 तासात 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 54,31,319 इतकी आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 94.28 % एवढे झाले आहे. (newly 14123 patients have been tested positive in Maharashtra)

मंगळवारी राज्यात 477 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 32 मृत्यू नोंदवण्यात आले. तर वसई-विरार 31,सातारा 28, मुंबई 23 मृत्यू झाले. मृत्यूचा दर 1.67% इतका आहे. आज नोंद झालेल्या 477 मृत्यूंपैकी 430 मृत्यू हे मागील 48 तासातील, तर 137 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तर आठवड्यापूर्वी झालेल्या 377 मृत्यूंची नोंद कोविड पोर्टलवर मंगळवारी प्रकाशित करण्यात आली. मृतांचा एकूण आकडा 96,198 इतका आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 2,30,681 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा: "लशींची अडचण दूर करण्यासाठी शरद पवार करणार मध्यस्थी"

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,52,77,653 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,61,015 (16.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17,68,119 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत, तर 9,315 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.